शर्यत
शर्यत
1 min
12.1K
गजाननाची षडाननाची
शर्यत झाली सुरु
जमले देव ऋषी मुनी गुरु ||
षडानन तो बलवान
मयूर वाहन वेगवान
त्वरे निघाला निश्चय केला
जग प्रदक्षिणा ही करु ||१||
जमले देव ऋषी मुनी गुरु ||
गजानन तो बुद्धिमान
माय पित्यासी केले वंदन
मूषका्री आरुढ होऊन
केली प्रदक्षिणा तुरुतुरु ||२||
जमले देव ऋषी मुनी गुरु ||
यावरुनी जन बोध घ्या हो
मायपिता हे जग माना हो
जगी याहुनी श्रेष्ठ नाही
कोणी ही महागुरु ||३||
जमले देव ऋषी मुनी गुरु ||
