शृंखला
शृंखला

1 min

22
मार्ग मोकळा नसे बंधन लागे छंद गतीचा
कर्मिते आपसुक पाहते नेमके घेत वेध प्रगतीचा
भोवताली गर्दी माझ्या माझ्याच प्रतिभेची
कोण जाणे,ऐकते मनिच्छा त्या उरीच्या वेदनेची
कवेत येई आभाळ वेचले जेव्हा पाचु
सहदयी कळवळ गुंजली निष्ठा लागली नाचु
शृंखला गुंफता अनामिक चौघडे वाजती सुखाचे
जिंदगी निराळी अनुभव सरस देई क्षण स्वप्नाचे
परीस प्रयत्ने वेगळ्या वाटा आरशात दिसती आनंदाच्या
आंतरीक आकांक्षाही स्वैर ज़ाई गावा स्वप्नांच्या