STORYMIRROR

Varsha Chopdar

Others Children

4  

Varsha Chopdar

Others Children

शृंगार व्याकरणाचा

शृंगार व्याकरणाचा

1 min
459

चला मुलांनो, आज शिकूया गंमत व्याकरण विभागाची


पंचेंद्रियांची साथ घेवूनी पहाट उजाडू नव्यानी

उच्चारांच्या ध्वनीची पेटी उघडू या ज्ञानात भर पाडू या


अक्षरांचे होती शब्द, शब्दांची होती वाक्य वाक्यांचे होती उतारे,

उतारांचे होती घडे धड्यांचे पुस्तक अभ्यासूया साहित्यसंपदा पाहू या


येती कार्ये घेवूनी शब्दांच्या जाती जपूया अर्थाच्या नाती

कर्ता कोण? कर्म कोण? प्रयोगातून अभ्यासूया प्रश्नांशी खेळ खेळू या


संधी आणि समासाची तर बातच वेगळी एकमेकांशेजारी येतो

वेळो-वेळी शब्दांचा सामासिक विग्रह करूया संधी व समासाची सांगड घालू या


व्याकरणाचा साज शृंगाराने त्यात असलेल्या कलाकृतीने

भाषिक कौशल्य अभ्यासूया भाषेला विविध रंगानी नटवूया


Rate this content
Log in