STORYMIRROR

Dinesh Kamble

Others

3  

Dinesh Kamble

Others

श्रमाचे महत्व

श्रमाचे महत्व

1 min
527

बैसूनिया खाली । वेळ वाया गेली ।

आणिक खुशाली । हरवली ॥ १॥


श्रमजीवी लोकं । असती जे जगी । 

किर्ती गाजे जगी । मात्र त्यांची ॥ २॥


करू नका कधी । श्रमाचा कंटाळा । 

हाचि ठोकताळा । ध्यानी धरा ॥३॥


होत नाही साध्य । श्रमाविना काही । 

नियम तू हा ही । ध्यानी धर ॥ ४॥


श्रमाची किमया । दिनेश सांगतो । 

तुम्हांला मागतो । वचन तों ॥ ५॥


राहू श्रममग्न । जीवनात सदा । 

आलस्याची बाधा । होऊ नये ॥ ६॥


Rate this content
Log in