STORYMIRROR

Savita Kale

Others

3  

Savita Kale

Others

श्रमाचे महत्त्व

श्रमाचे महत्त्व

1 min
358

एक गडी होता भारी

श्रीमंती वाहे त्याच्या घरी

काम काही ना तो करी

निवांत असे सदा स्वारी

माझा असेल तो हरी

देईल मला खाटल्यावरी

वेडे वाटी कष्टकरी

असे वागे अविचारी

भाग्य असे आजमावी

काढी रोज तो लॉटरी

बाता लाखाच्या तो करी

खाली झाली ती तिजोरी

करी आता पश्चाताप

जेव्हा झाला तो भिकारी

श्रमा नाही हो पर्याय

बात पटली ही खरी

गेला आपल्या शिवारी

मोती घामाचे तो पेरी

तिथं उगवलं सोनं

मिळे कष्टाची भाकरी

श्रम केल्या मिळे यश

त्याला जडला तो छंद

सारी सुवासिके फिकी

किमती घामाचा सुगंध

नको मोत्याचा तो हार

त्याने सोबत सोडली

सखी घामाची ती धार

ज्योत जीवनी पेटली


Rate this content
Log in