STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

श्रमाचे महत्त्व....

श्रमाचे महत्त्व....

1 min
272

आयुष्यावर बोलावे

वाटले जरा मला

सांगावेसे वाटले 

मनातले मी तुला.....


आयुष्य सर्व वाहिले

मी माझ्या कुटुंबाला

जीव लावला मुलाबाळांना

हाती सुखाचा प्याला आला....


जीवन अर्धेअधिक सरले

आयुष्याच्या हिंदोळ्यावर रमले

गतकालातील आठवणीत

मी मात्र सुखावले......


आई बाबांची एकुलती एक कन्या

सुखात, लाडाने मी वाढलेली

लग्नानंतर वैभव मला मिळाले

त्यांच्यातच मी रंगून गेली....


मला श्रमाचे महत्त्व समजले

श्रम करताना मी काॅलेज पूर्ण केले 

नोकरीला लागून कुटुंबाचा भार

पेलण्यात मला यश येवूे लागले...


संसार झाला सुरू माझा

स्वप्नवत आयुष्य सुरू झाले

मौज, मजा , थोडी जबाबदारी

दिवस भुर्रकन जावू लागले....


मध्यतरी वैभवचे आजारपण आले

मी मात्र खचून नाही गेले

सर्वच येणार्‍या परिस्थितीला मी

मात्र धीराने तोंड दिलै.....


मुलांना लाडाने, शिस्तीने वाढविले

शाळेतही उत्तम कार्य केले

सर्वांच्याच कौतुकास मी पात्र ठरले

नवजीवनास मी सामोरी गेले.....


दररोजच्या व्यापातून जरा

मी बाजूला थोडी सरकले

कविता , चारोळी , बालकाव्य

याचे लेखन मी करू लागले....


जीवनाच्या या नव वाटेवर

कवितांचा मज ध्यास लागला

नमन सर्व गुरुजनांना माझे

ज्या सर्वांमुळे माझा हा छंद वाढला....


माझ्या कविता आता प्रसिद्ध

होवू लागल्या आहेत स्टोरीमिरवर

सर्वांच्याच साथीने माझे नाव

कोरू लागेलय वाचकांच्या ह्रदयावर......



Rate this content
Log in