श्रमाचे महत्त्व
श्रमाचे महत्त्व
1 min
168
कुठं पाऊस
कुठं कडकडीत ऊन
थंडी, ऊन, वारा, पाऊस
सारेच आपआपल्या मस्तीत
मस्तीतही आहे एक अनामिक गुर्मी
त्याच गुर्मीत आहे उर्मी
थोडासा थकशील
होईल थोडाफार त्रासही
आणि जेव्हा थकशील त्रासशील
तेव्हाच निर्माण होईल
एक नवीन कहाणी
विश्वास ठेव...
हेही दिवस जातील
आणि येतील नवीन दिवस
तेव्हा आपोआपच बदलतील
तुझ्या हातावरच्या
या आडव्या तिडव्या रेषा
आणि...
तो दिवस फक्त तुझाच असेल
