Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

manisha khamkar

Others

3  

manisha khamkar

Others

श्रमाचे महत्त्व

श्रमाचे महत्त्व

1 min
90


या गगनचुंबी इमारती

 हे श्रीमंताचे मोठमोठे बंगले 

हे टोलेजंग वाडे साकारले कुणी 

कष्ट करणार्या कामगारांनी

हे सिमेंटचे रस्ते ,उड्डाणपूल

रेल्वे रूळ बांधले कुणी

हातावर पोट घेऊन वणवण

फिरणार्या गरीब कामगारांनी

हे प्रशस्त माॅल हे सिनेमा हॉल

दर्शन देतात भारताच्या प्रगतीचे

पण दिसत नाही कुणास हात

सिंमेटने भेगा पडलेल्या मजूराचे

दगडावर घणाचा घाव घालताना

कंप पावते पायाखालील धरणी

पोटाची भूक भागवताना 

कंप का?पावत नाही धमणी

इतभर पोटासाठी भटकतो 

 घेऊन समदं बिर्हाड पाठीवर

श्रम करून साकारतो

स्वप्न सुखाचे हातावर

चार पैसे जमवतो शेकारण्या

छप्पर मोडक्या घराचे

सणवार साजरा करण्यास

स्वप्न पाहतो नव्या वस्राचे

काबाडकष्ट उपसून मिळते भाकर

कष्टांनेच मिळते जगण्या बळ

रोज नव्या उमेदीने हात

नव्या वास्तूस आकार देतात

कष्ट करणार्यां लोकांचे हात

गळणार्या घामावर विश्वास ठेवतात

श्रीमंतीचे स्वप्न पाहणा-यानी

श्रमाच्या गावी चालून यावे

मोडतात किती पायी काटे

थोडेसे रक्तबंबाळ ही व्हावे

कष्टाची भाकर खाल्ल्यास

रातच्याला झोपही छान लागते

श्रमाचे महत्व काय तेव्हाच कळते


Rate this content
Log in