श्रीरामनवमी
श्रीरामनवमी
एकवचनी एकपत्नी थोर श्रीरामाला त्रिवार वंदन
पदस्पर्श करू त्यांचा, लावू केसर चंदन
चौदा वर्ष वनवासाची, सोसली दु़्ःखाची झळ
मातृपितृ आज्ञेची ती होती एक कळकळ
नाही तक्रार, नाही दोष या प्रारब्धाला
नियतीचे नियम पाळा हा नियम घालून दिला
वानरांच्या मदतीने बांधला तो रामसेतू
खारीचा तो सिंहाचा वाटा, मदतीचा हेतू
आशीर्वादाचे ती उमटली तीन पाठीवर बोटं
लंकादहन केले हनूमानाचे नावं केले मोठं
रामनवमीला वाहू रामफळ
सर्व कामाला येइल बळ
क्षणाक्षणाला आठवावा राम सावळा धनी
मनाच्या गाभार्यात नित्य राम आळवावा मनी
