श्रीराम
श्रीराम
काळजात दाटली प्रतिमा त्या रामाच्या नावाची,
शृंगार मिटला आज स्वत्वाच्या भ्रमाची
जीवनाचा मार्ग कळला सत्याचा प्रकाश घडला,
काळाच्या वळणावर आयुष्याची गाठ खचली
काळजात माझ्या रामाची प्रतिमा दाटली
तीन मातेचा एक पुत्र ज्याच्या शौर्याची नव्हती सूत्र,
पराक्रम घडविला प्रत्येकाच्या मनी धन्य ती सीता न तीचा धनी
सात्विक ज्ञान मिळाले तर आम्ही शत्रूच्या चरणी पडू,
अधर्माच्या मार्गावर जाणाऱ्याला त्याच जमिनीत गाढू
आयुष्यातील संघर्षाच्या पराक्रमाचा इतिहास घडला,
धन्य तो दशरथ ज्याला पुत्र रामासारखा भेटला
शौर्याचा अभिमान चेहऱ्यावर दिसे शब्दात ममतेची वाणी असे
पुत्र लाभला असा कणखरं वनवास भोगला ज्याने प्रखरं
शब्द न पडे ज्याचा जमिनीवरं विजय प्राप्त केला असत्यावरं
शबरीचे उष्टे बोरे खाऊनी अहिल्याला ज्याने म्हटले आई
धन्य तो लक्ष्मण आणि त्या कौशल्या माई
अहंकार ज्याच्या चेहऱ्यावर ठरला नाही,
पराक्रम असा रावणही ज्यांच्यासमोर तरला नाही
सत्ता चालकाची परिभाषा ज्यांनी बदलली
त्यांना मनुष्यात्वातून देवत्वाची प्रतिमा प्राप्त झाली
