श्रीमंती
श्रीमंती
सागरासम पैशातून
पेलाभर करी दान होण्यास
जगप्रसिद्ध करत असे जीवाचे रान
मिळे त्यास जयघोष
मिळे त्यास मानसन्मान
न मिळे मानसिक समाधान कधी
ओठांवर गोड हास्य अन् दान असावे निस्वार्थी
हेच खरे असे पुण्य आणि हीच खरी श्रीमंती
प्रयत्न आणि मेहनतीने
करावे सदा सत्कर्म
ना कोणास हिणवावे कधी
जपावा मानवधर्म
विवेक जपावा,
निराधारांना मदतीचा
हात द्यावा कधी हाती
राजा ही यशस्वी तेव्हाच जेव्हा
प्रजा असे त्याच्या साथी
तोच खरा श्रीमंत मनाचा अन्
तीच खरी मनाची श्रीमंती
असता ताटात भाकरी अर्धी
तरी दे इतरांना स्वतः राहून उपाशीपोटी
तोच माणूस खरा या जगी, आहे तीच
खरी मनाची श्रीमंती
उद्धटपणाचा नसे लवशेष
आदर असे सर्वांप्रती
नम्रता अंगीकारूनी
सर्वांना करी स्मितहास्य जो दिसल्यापरी
तीच खरी श्रीमंती
चिरकाल काहीच नाही या जगात
पैसा,सौंदर्य, प्रतिष्ठा अथवा संपत्ती
ज्याची चिरंतन किंमत अगणित समाधान देते
तीच आहे मनाची श्रीमंती
