STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

श्रीमंती

श्रीमंती

1 min
421

लहानपणी 

मी खूप श्रीमंत होतो

कारण पावसाच्या वाहणाऱ्या पाण्यात माझी पण २-३ जहाजे चालायची,

मोकळ्या हवेत कागदाची का असेनात स्वतःची 

विमाने उडायची

भले चिखलाचा का असेना पण स्वतःचा 

किल्ला असायचा,  

श्रीमंत...आठवणीच!

  

आता ही मी श्रीमंत आहे


जनसागरात माझे जहाज सन्मानाने विहारते

आचारविचारांच्या पंखांनी उत्तुंग नभात माझे विमान झेपावते


सौख्य समाधानाच्या छायेत सदा कौलारू घर माझे स्थिरावते

सुख, सुखाची श्रीमंती काय हे आता जाणवते


सुख समाधान शांती नांदताना

वर्तमानात जीवन जगताना 

हे सारे कळते..!


Rate this content
Log in