STORYMIRROR

Dipali patil

Others

4  

Dipali patil

Others

श्रेष्ठदान

श्रेष्ठदान

1 min
101

उमलताच पुष्प संसारवेलीवर

सुगंध जीवनी दरवळला

रत्न कन्याचे पोटी आले

आदराने स्वीकारा लक्ष्मीला


बेटी म्हनजे धनाचिं पेटी

म्हण ना खोटी अर्थाची

सौभग्याने मिळते मुलगी

जशी वात तेवते पणतीचिं


उद्धरन्या कुटुंब दोन्ही

जन्म घेते कन्या

कल्याण करते घराचे

सत्य हे आहें जोगे मानण्या


संगोपन करतात पालक

आनंद ह्यात सामावला

जपतात फुलाप्रमाणे मुलीला

पाठ ना देत कर्तव्याला


येताच तरुणपन उंबरठ्यावर

शोधतात उपवर खास

येतो दिवस विवाहाचा

आयुष्यभर ज्याची असते आस


कन्या येताच मंडपात

जीव हेलावतो पालकांचा

परी घर शोधले उचित

आनंद असतो सप्तआसमंताचा


विधी येतो कन्यादानाचा

भरून येतात डोळे

जपले लेकीला इतके वर्ष

रडतात मायबाप भोळे


पोटचा गोळा जाहला परका

सुखाने नांदो हीच अपेक्षा

करून कन्यादान मोठ्यामनाने

तरी चेहरा हसरा असने हीच सत्वपरीक्षा



Rate this content
Log in