।। श्रद्धा भंग।।
।। श्रद्धा भंग।।
1 min
7.5K
दगडाचा देव । फुटला न पान्हा
काय झाला गुन्हा । लेकराचा
पाषाण कोरून । देव उपजिला
भक्तीने पूजला । रक्षणार्थ
दारात राक्षस । घालतो थैमान
हा गपगुमान । गाभाऱ्यात
कसा रे ठेवावा । चरणी विश्वास
कोंडलासी श्वास । निचेतन
झालास आंधळा । मुका की बहीरा
आता कोंडमारा । सोसवेना
विश्वाचा विधाता । कसा तू निष्ठूर
धर्म युधिष्ठिर । हरलेला