STORYMIRROR

Shila Ambhure

Others

3  

Shila Ambhure

Others

श्रावणमासी

श्रावणमासी

1 min
415

भिजवितो धरेला

वरूणराजा व्यस्त आज

चढवितो साज

चैतन्याचा


न्हाली धरती

पसरला हवेत गारवा

छेडितो मारवा

पवन


तृप्त जाहली

तप्त अवनी सारी

गंध वाऱ्यावरी

मृत्तिकेचा


मुलायम हिरवळ

शालू जणू मखमाली

वसुंधरा ल्याली

आनंदे


आला श्रावण

रुक्ष काळ सरला

हर्ष भरला

चराचरांत


Rate this content
Log in