श्रावणातल्या सरीं
श्रावणातल्या सरीं
1 min
300
श्रावणातल्या सरींना देवा आता बरसू दे
भेगाळलेल्या धरेला चिंबचिंब भिजू दे
तृणगालिचे धरेवर अंथरलेंले
मनमयूर डोळ्यांमध्ये रेंगाळलेंले
मोराला पिसारा फुलवून जरा नाचू दे
काळे निळे ढग बघ दाटूनि आले
आकाशाला काळा रंग देऊनि गेले
वृक्षवेली लताना आता बहरू दे
पशुपक्षी रानामध्ये हैराण झाले
पावसाची वाट बघून झुरू लागले
तहानलेल्या चकोराला पाणी पिऊ दे
भेगाळलेल्या धरेला चिंब भिजू दे
