STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Others

3  

Ramkrishna Nagargoje

Others

श्रावण

श्रावण

1 min
234

नदी वाहते खळखळ,पूढे

पक्षी उडती भरभर,बरे

पडे कोवळे उन सारे,

आकाश कसे निळे निळे.


कळ्या उमलती,फूले हसती,

झुळ झुळ वाहे रानवारा,

निळ्या आभाळी ढग लागती,

सर,सर,सर येते ,

क्षणात पुन्हा निघून जाते.


ओला रस्ता,गवत हिरवे,

शेतफुले रानमळे,

श्रावण महिना तळे साचले,

वृक्षवेलींना आली फुले.

हा श्रावण मधुर चोहीकडे.


गायी चरती,वनी वनचरे,

हरिण मध्येच उंच उडे,

फुले पिसारा,मोर नाचे,

चमकती शंभुची शिखरे.


आला श्रावण नाचू आनंदें,

पंचमीसी फेर पडे,

गां गं ,सखी गीत नवे.


आला श्रावण,सर येते,

रवी मित्र,हा झाकुन घेई,

बाहेर योता ऊन कोवळे,

श्रावण आला, मोद भरला,

वसुंधरेसी हिरवा चुडा.



Rate this content
Log in