STORYMIRROR

Savita Kale

Others

4  

Savita Kale

Others

श्रावण

श्रावण

1 min
285

निसर्गात साऱ्या रंगांची उधळण

असा तो सुंदर रंगारी श्रावण


इंद्रधनुष्याची सतरंगी कमान

कोकीळही धरते सुंदर ती तान


डोंगरातून नदी नख-यात येते खाली

धरणीवर लाजल्या नाजुकशा वेली


हिरवा तो रंग दिसे चहू दिशा

शिकवती सुमने सौंदर्याची भाषा


सणांचा महिना, असा हा श्रावण

साऱ्या सृष्टीला देतो हा जीवन


समृद्धीने झाले हिरवेगार रान

निसर्गाचे रूप खुलवितो श्रावण


साहित्याला गुण द्या
लॉग इन