श्रावण
श्रावण
1 min
181
श्रावण दिवस श्रावण रात
राधा हसली गाणे गात
टपटप श्रावण धारा
अल्लड झाला उनाड वारा
नवागताचा फुले पिसारा
निसर्गाची मिळता साथ
हिरवी पाने हिरवी धरती
हिरवी पाती सौंदर्य लेती
थेंब थेंब धारा पाने झेलती
सजले अंबर नक्षत्र रात
श्रावणाच्या मधुर गुजगोष्टी
सुभाग सुरवर झाली सृष्टी
चराचर प्राण्यांची प्रणयी तुष्टी
कान्हा बसला पावा वाजवीत
