STORYMIRROR

Sayali Kulkarni

Others

3  

Sayali Kulkarni

Others

श्रावण श्रावण...

श्रावण श्रावण...

1 min
90

श्रावण श्रावण रंगे उन पावसाचा खेळ.. 

श्रावण श्रावण सांधे ऋतू संस्कृतीचा मेळ.. 


श्रावण श्रावण हिरवी नटलेली वनराई.. 

ग्रीष्माची मरगळ सरते भरे चैतन्य ठाई ठाई.. 


श्रावण श्रावण अंगणी प्राजक्ताचा सडा... 

मृद्गंधाच्या सुवासाने भरला आसमंत सारा... 


श्रावण श्रावण नभी इंद्रधनूची कमान.. 

गवताच्या पात्यावर शोभे दवाची माळ छान.. 


श्रावण श्रावण फुलांनी बहरलेला बाग... 

पक्षांच्या किलबिलाटाने पहाटे आलेली जाग.. 


श्रावण श्रावण गर्द वनी नाचणारे मोरं.. 

पावसात आनंदाने चिंब भिजलेली पोरं.. 


श्रावण श्रावण सया माहेराला येती.. 

अंगणी सखीसंगे झुल्यावरी त्या झुलती...


श्रावण श्रावण जरा जिवंतीकेचे पूजन.. 

मुलांच्या दीर्घायुसाठी माय करते औक्षण.. 


श्रावण श्रावण पुजू भोळ्या शंकराला... 

सया बहिणीसंगे जागवू मंगळागौरीला... 


श्रावण श्रावण आली नागपंचमी आली. 

 माय बहिणींच्या हाती सुंदर मेहेंदी सजली.. 


श्रावण श्रावण आला रक्षाबंधनाचा दिन.. 

बहीण भावा बांधे राखी करण्या आपले रक्षण.. 


श्रावण श्रावण गोपाळकाला हा रंगला.... 

फोडण्या दहीहंडी लाडका कन्हैया आला..


श्रावण श्रावण सर्व ऋतूमासांचा हा राजा.. 

सकळ जनांना सुखविण्या साजिरा श्रावण आला...


Rate this content
Log in