श्रावण प्रेमिकांचा
श्रावण प्रेमिकांचा
1 min
163
सळसळणा-या वा-या
किती तुजला विनवू?
सवे खट्याळ साजणा
नको पदर उडवू
झंझावात अनिलाचा
मुजोरीने बळावला
घन ओथंबून येता
मनी सखा सुखावला
रिमझिम वर्षाधारा
अलगद झेलुनिया
सुखावले प्रेमीजन
सवे मोदे भिजताना
संथावल्या वर्षाधारा
किलबिल सुरु झाली
नजरेने नजरेला
दाद पसंतीची दिली
