श्रावण दान
श्रावण दान
1 min
416
झोळीत पडलं देवाचं दान
हसला चन्द्र लाजल चांदण
हिरव्या रानी पाचू चे बन
नाचला मोर नाचला श्रावण
केतकी बाग हळदी उन्ह
नाग पंचमी डोलतो नाग
टप्पोर मोती पाना वरती
केका मोराच्या साद घालती
श्रावण सर माहेरवाशीण
झिम्मा फुगडी वाजे पैंजण
झुला झुलला नंदनवन
मोहरली मंजिरी वृन्दावन
झोळीत पडलं देवाचं दान
श्रावणाने दिला सृजन वाण
