STORYMIRROR

Jyoti Nagpurkar

Others

1  

Jyoti Nagpurkar

Others

श्रावनधारा

श्रावनधारा

1 min
371

त्रस्त होते भाव अंतरी

भिजले मन तुझ्या स्पर्शानी

केलास विलंब नेत्रसुखास 

श्रावणात स्वागते अंगणी


जीव तहानत थेंबासाठी

तुझ्यातली ही अद्भुत माया

ओसंडला अखेर अंगणी  

विसावली कुशीत ही काया


सरी, तुझ्या येण्याने

सरले उदासी भाव

भरभरून प्रीत ओथंबून

तृष्णामाईत वाहते नाव


हर्षदा आली चोहीकडे

घेतले धरणीने नवखेपणं

नभासही लागली ओढ

फुलेपानांवर सजले गाणं


करते विनवणी , मी तुज

सोडवू नग, साथ अर्ध्यातं

श्रावणधारा, वाह अखंड

ऊतवं आनंद, ॠतूअंतातं...!!!!



Rate this content
Log in