शोर
शोर
1 min
292
हेलकावे देई मनाला
कोठे वादळा जोर आता
रोजच्याच हादरल्याने
झालो कसा मुजोर आता
तडे भावनेस माझ्या
जिद्द ती शाबुत आहे
मोलाचे जपलेच मी
फालतुच का घोर आता
जाईल घडी टळुन ही
सांग ती मन माझे मला
आली जरी वाटेत या
वेळ किती कठोर आता
धागा-धागा जुळवित
बांधले नात्यास मी
जपतो बस तेच सारे
नाही खरा कमजोर आता
वाट शोधेल माझी
हरवली काळोखात जी
देईल दिशा भवानी
रात जरी घनघोर आता
दडले मनात काही
दवंडी चौकात कशाला
का उगाच भावनेत
मी करावा शोर आता
