शोधत असते तुला
शोधत असते तुला
1 min
246
सांजवेळीच्या शांततेत
एकांतात मन गुंतलेलं असताना
दुरदूरपर्यंत नजर जात
ठाव तुझा घेताना
आल्हाददायक हवेच्या स्पर्शात
दिसणाऱ्या टपोऱ्या त्या दवबिंदूत
इंद्रधनूच्या सप्त रंगात
आजूबाजूच्या चहू दिशात
सूर्याच्या पहिल्या किरणात
मंद वाऱ्याच्या झुळुकात
खळखळणाऱ्या पाण्यात
शीतल चांदण्यात
नजरेतील त्या लाजेत
ओठांवर उमटणाऱ्या माझ्या हास्यात
हातांवरच्या त्या भाग्यरेषांत
शोधत असते मी तुला...
