STORYMIRROR

Monali Kirane

Others

2  

Monali Kirane

Others

शोधा पुन्हा बाल्य

शोधा पुन्हा बाल्य

1 min
9

हरवतंय कुठे बालपण वागवत बंदुका खांद्यांवर,

लटकतात कच्च्या कैऱ्या तरी ललचावत फांद्यांवर.

हरवलेतच जणू तिथे लगोरी रचणारे हात,

मोठ्यांच्या दंगलीत देतात दगडं मारायला साथ.

चिमुकल्या हातांना पडतोय मोबाईलचा विळखा,

तणावलेल्या चेहऱ्यांवरचे निर्लेप हास्य ओळखा.

होऊ लागलेत लहानांनाही मोठ्यांचे मनोविकार,

लठ्ठपणा-डायबेटीस बिघडवतोय बाल्याचा आकार.

पुन्हा एकदा होऊ लहान मिळून करू कल्ला,

उत्साही नवजीवांवरचा परतवू या हल्ला.


Rate this content
Log in