STORYMIRROR

Rohit Khamkar

Others

2  

Rohit Khamkar

Others

शोध

शोध

1 min
304

तूझा विचार करताना वेळेच भानच राहत नाही, 

तूझ्या शिवाय दुसर काहीच सुचत नाही.


तू होतीस आहे आणी राहणार निरंतर, 

आपुलकी सोडून बाकी सगळ्यात अंतर.


गुरफटून गेलोय तूझ्यात असा,

लोक विचारतात हाच का तूझ्या जगण्याचा वसा.


तूझ हसण रडण बसण आणी असण किती छान, 

पण नजर लागलेल्या आयुष्याच नशीबच घाण.


नाराज नाही तूझ्यावर रोषही नाही,

सगळी हिशोब चुकती केली राहिली काय बाकी?


कारणे तेव्हा ही खूप होती आताही आहेत, 

कुठलेही एक निवड धावपळीच्या घाईत.


मी मात्र जिथे होतो तिथेच उभा आहे, 

शोधायचय तिथेच जिथे हरवलो आहे.


Rate this content
Log in