शोध ...!
शोध ...!
शब्दांचे वार का जपावेत आसमंताने ?
ते तुझेच आघात आहेत
माझ्या काळजावरचे ....!
काळजातल्या आघातांनी
कपारीत लपलेलं आभाळ
ओसंडून वाहायला लागल्यावर
चिंब होऊ नये म्हणून
सांग नां मी कुठे लपावं ....?
लपंडाव हा घडतांना
बघण्यास आसुसलेल्या मनाने
शोधावे तरी कुठे तुला ....?
तू तर मिरेच्या सुरात
समरस झालेला असतांना ....!
भरकटतोय जीव आता
उमजून गेले मला ,,,,
शब्दात माझ्या तू न मावणारा ,
जेवढा तू काळजात वसलेला ....!
मग सांग नां ,
भरकटल्या जीवानं
कोठे शोधावे तुला
आसमंतात , कपारीत की काळजात....?
