शोध
शोध
1 min
288
चंद्रावर गेला चांद्रविर
शोधण्या नव अवकाश
मीच पहिला पोहोचलो
गर्वाने करत जल्लोष
अचंबित झाला पाहून
आदिमानवाची चाहूल
समिप दोघे येताक्षणी
एकमेका पडली भूल
समन्वय करून दोघे
अर्धा चंद्र वाटुन घेऊ
शोध नावे अमेरिकाच
आम्ही बनु तुमचे भाऊ
चांद्रविर हा अमेरिकेचा
न, घाबरलेले आदिमानव
समेट होता दोघांचाही
चांदोबाही दिसला अभिनव
