शोध उःशापाचा
शोध उःशापाचा
औट घटकेच्या राज्यासाठी
नीती नियमाला
धर्म अधर्माला
सत्य असत्याला
पाप पुण्याला
मुठ माती देत
करत असतो आपण
व्याख्या आपल्या सोईसांठी
सोईस्कर लावतो अर्थ आपल्या स्वार्थासाठी
करतो आपण कमरेखाली वार
करतो राज्य मनासारखं
एखाद्या उजाड माळरानांवर
रंगलेला डाव उधळुन टाकतो
स्वतःच्याच स्वार्थासाठी
योजना बदलतो
लोक बदलतो
विचार बदलतो
स्वतःच्या स्वार्थासाठी
लढाई हरलो तरीसुद्धा
जिंकल्याच नाटक करत राहतो
पराभूत अवस्थेतही
बदला घेतो,बदलण्यासाठी
हे असचं चालत आलंय
आदिमानवापासून
अष्मयुगांपासून
आजच्या कलीयूगापर्यत
मैलांची दगड मागं पडतायत
सुखाचा हव्यास आहे
सुख सुविधा वाढतायत
जनावरांच्या पेक्षा माझी ओळख वेगळी
या कवचकुंडली विचारांच खोटा स्वार्थ आहे
पण ....
प्रगतीच्या या टप्प्यावर सुद्धा
माणूस विसरलाय
आचार विचार संस्कृती संवेदना
पुन्हा बनत चाललाय एकलकोंडा
पुन्हा संभ्रमित झालाय
आपलं स्वातंत्र्य कुण्या
प्रेषीताच्या मठात नाहीतर
बाबांच्या गुहेत
माणूस भटकतोय वणवण आज पुन्हा
उःशापाच्या शोधात
त्या ईश्वर परमेश्वरांच्या गळाभेटीसाठी
