शनिवार सुप्रभात...!
शनिवार सुप्रभात...!
श रम कशी वाटत नाही
नी लाज कशी वाटत नाही
वा नगी दाखल ही वाक्यं
र डक्या राजकारणाने डोक्यात बसली...!
सु खासुखी नको नको ते जीवनात
प्र सवून नामा निराळी झाली
भा ग्याचे दुर्भाग्यात रूपांतर होता
त डफड जीवाची उगाच झाली....!
प्रत्येक दिवस आता आम्हा
बेभरवश्याचा वाटतो
दुर्दशा पाहून जीव आमचा
खरोखरच कासावीस होतो...!
असो कोणताही वार, सुप्रभात म्हणताना
थोडे मन शंकाग्रस्त होते
तरीपण आहे त्यात समाधान मानून
सुप्रभात म्हणताना अजूनही बरे वाटते....!
असेना कोणाचेही राज्य
ताटातले वाटीत,वाटीतले ताटात इतकेच खरे
जे जे होते ते ते पहात राहणे
हेच जीवनात सत्य नूरे.....!
सुप्रभात...!