STORYMIRROR

Savita Kale

Others

4  

Savita Kale

Others

शंभूराजे

शंभूराजे

1 min
275

शिवबांचा पुत्र शोभतो

शूर शंभूराजा

पराक्रमी त्यांच्यासारखा

जगी नाही दुजा


वाघाचा जबडा चिरला

झेप घालून शिकारी

म्यानातून शत्रूच्या

थंड पडे तलवारी


नाना बालंट दरबारी आणिती

कलंक असा चारित्र्या लाविती

लक्तरे हजार अब्रुची करिती

आग ओकुनी सूड उगवती


आपल्यांनीच अति ग्रासिले

परक्यांनी मग बहु त्रासिले

पाऊल जराही मागे न पडले

शिवरायांचे स्वराज्य राखिले


घरातलेच होते भेदी

बादशहा मग करे कैदी

नाना अमिषे तया दाखवुनी

धर्म तयांचा बदलवू पाहती


कणभर विचार न होई कमजोर

बादशाह मग वाढवी जोर

सळया तापवून लोखंडाच्या

खाचा केल्या नयनांच्या


क्रूरतेची सीमा गाठून

जखमा केल्या जागोजागी

बादशहाला आणी जेरीस

स्वधर्माची लाज राखी


धर्मरक्षक असा खरा

बुद्धिमंत न कुणी दुसरा

स्वराज्यरक्षक शंभूराजे

तुम्हा आजही स्मरे जग सारा


Rate this content
Log in