शकुन वती मी
शकुन वती मी
शकुन वती मी,
वनस्पती मी
असते मंगल कार्याला
शकुन वती मी
रंग चढे ना
शुभ कार्याला
मेंदी म्हणती मला मीबागेचे असते कुंपण ...अल्लक्षित का असते पण?
रंग आपुला पालटण्याची
अंगी माझ्या कला....
सान मुलींची हौस पुरविते
तरुणींना तर मी आवडती
पुरुषही आत्ता लाविती केसा,
मोल न हौसेला
मीच बंधिते रेशीमगाठी
दोन घरांची जोडत नाती
साक्ष ठेवून मला नव वधू ती घाली वरमाला....
अर्पित असते मी हिरवे धन सौंदर्याचे मीच प्रसाधन
सोने, चांदीहुनी मानाचे स्थान
लाभले मला
वधू, वरच्या प्रेम मिळणी
काय सांगू गं सखे साजणी
नवरी संगे जातेही पण पाठ राखणीला
