सहज लागतो ठसका
सहज लागतो ठसका
1 min
430
सहज लागतो ठसका
वाटतं आठवण काढतंय कुणी
घशात अडकतो घास
उगाच शंका येते मनी
घोट घेते एक पाण्याचा
थोडं निवांत व्हायला
ठसका निघुन जातो क्षणात
सोडून डोळ्यात पाणी...
मग येतो विचार
यावेळी ..?अवेळी...
कॅलेंडर फडफडतं भिंतीवरचं
तारखा ओशाळतात ओंजळी
चघळावी खडीसाखर हलकी
वेदना शमवाया जीवघेणी
ठसका मिसळतो गोडव्यात
तारखा बदलतात पानोपानी
कळत नसतं असं नाही
पण समजवत नाही कुणी
निःशब्द असतं सांत्वन
बोलतात ओंजळीत आठवणी
