STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

शिवयय

शिवयय

1 min
245

जिजाबाई,शहाजींचे

सुपुत्र अती लाडाचे

स्वराज्याचे स्वप्न उरी

बांधले ते कायमचे.....


स्वाभीमानी महाराज

सार्‍यांच्याच अंतरात

उतरले छत्रपती

निवास हो ह्रदयात.....


सदगुणांची ही खाण

उंचवी जगती मान

आठवूया हा प्रताप

मराठ्यांची राजा शान....


तेजःपुंज व्यक्तीमत्व

स्फुर्तीमनी जागवते

स्वराज्यासाठी लढावे

हत्ती बळ संचारते.....


सर्वच गुणसंपन्न

गुणांचा हा अधिपती

मावळ्यांचा होता देव

राजा शिव छत्रपती......


स्त्रियांच्या हो सन्मानाची

शिस्त अती शिवबांची

मंदीर,मस्जिद एक

तमा केली देवतांची.....,


गड ,किल्ले हो जिंकूनी

सलामीच स्वराज्याची

स्वप्न सत्य माऊलीचे

गाणी गावी शिवबांची....


युगप्रर्वतक शिवबा

राजा आहे स्वराज्याचा

हिकमती लढवय्या

मुजरा यांना मानाचा...


Rate this content
Log in