शिवशाही
शिवशाही
1 min
272
गेली होती रया
या राष्ट्राची
नव्हती मुभा
श्वास घेण्याची
नव्हता भाकर तुकडा
नि अत्याचार होते रोजच
परकीयांचे आक्रमण
दिसे त्यांचा माजच
तुटलेली स्वप्ने
नव्हती दिशा
जीवनात भरलेली
फक्त निराशा
आला आशेचा किरण
जन्म झाला शिवनेरीवर
मोहोर उमटली साऱ्या
मराठी मनावर
गाऊ लागले पक्षी
बागडू लागले प्राणी
सुकलेल्या मुखांतून मग
ऐकू येऊ लागली गाणी
शिवबा आमुचा गरजला ऐसा
बिमोड केला अत्याचाराचा
रयतेला स्वराज्य मिळालं
घास लाभला सुखाचा
आणलं रामराज्य
संपली सगळी सजा
धन्य झालो आम्ही
मिळाला जाणता राजा
