शिवराय
शिवराय
2 mins
204
जिजाबाई, शहाजींचे
सुपुत्र अती लाडाचे
स्वराज्याचे स्वप्न उरी
बांधले ते कायमचे.....
स्वाभिमानी महाराज
सार्यांच्याच अंतरात
उतरले छत्रपती
निवास हो हृदयात.....
सद्गुणांची ही खाण
उंचवी जगती मान
आठवू या हा प्रताप
मराठ्यांची राजा शान....
तेजःपुंज व्यक्तिमत्व
स्फुर्तीमनी जागवते
स्वराज्यासाठी लढावे
हत्ती बळ संचारते.....
सर्वच गुणसंपन्न
गुणांचा हा अधिपती
मावळ्यांचा होता देव
राजा शिवछत्रपती......
स्त्रियांच्या हो सन्मानाची
शिस्त अती शिवबांची
मंदीर, मस्जिद एक
तमा केली देवतांची.....
गड, किल्ले हो जिंकूनी
सलामीच स्वराज्याची
स्वप्न सत्य माऊलीचे
गाणी गावी शिवबांची....
