STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

शिवराय

शिवराय

1 min
233

याल का राजे?

हाल माझ्या देशाचे

पहाल का राजे

पुन्हा एकदा फिरून याल का राजे?॥धृ.॥


जिजामाता आपली माता

शहाजीराजे आपले पिता

स्वराज्याची ज्योत पेटविली माऊलीने,

आपले रूप गोजिरे साजिरे हो बाळराजे।। १।।


समस्त जनतेच्या अंतरात

आपणच आहात हृदयात

स्वाभीमानी आपण, सदगुणांची खाण

स्वराज्याचे स्वप्न बांधले उराशी बाळराजे ।। २ ।।


तेजस्वी वाणी, आचरण बाणेदार

सर्वगुणसंपन्न, स्वभाव दिलदार

पाहूनी शत्रूला हत्तीचे बळ संचारत हो बाळराजे ।।३ ।।


स्त्रियांचा रक्षणकर्ता राजा

मुघलांना, शत्रूला देई सजा

मंदिर, मस्जिद एक भावना ठेवली आपण बाळराजे ।।४ ।।


धर्मरक्षणकर्ता, निरपेक्ष न्यायी राजा

दुर्जनांचा कर्दनकाळ, गनिमांचा वाजवायचा बाजा

मावळ्यांचे दैवत शिवछत्रपती बाळराजे ।। ५ ।।


Rate this content
Log in