शिव शंकरा
शिव शंकरा
महाशिवरात्रीला करती जागरण
भक्तांच्या मुखी तुझे नामस्मरण
प्रसन्न शंभू ला करण्याकरता
देवालयी चाले नित्य होम हवन
तुझ्या हाती जे डमरू वाजे
नैराश्याला त्याचा ध्वनी दूर सारे
त्रिशूलाचा महिमा भारी
समस्त दुष्टांचा संहार करी
नाव तुझे असे भोलेनाथ
तू अससी रूद्राचा नाथ
आम्हा सर्व भक्तांना लाभो
नेहमीच प्रभू तुझी साथ
वास्तव तुझे असे कैलासी
परी भक्तांच्या हृदयी वससी
हाक मारता तुजला भोलेनाथ
दर्शन देई तू भक्तांना साक्षात
भार्या तुझी माता पार्वती
त्रिखंडांत गाजे तुमची महती
पुत्र तुमचा शोभे लंबोदर
नाम ज्याचे विघ्नहर्ता गणपती
कृपेने तुझ्या देवा रचिले
या दासीने भक्ती गीत
प्रसन्न व्हावे माझ्या भक्तीला
हे बोलनाथ शिव शंकर
