सहिष्णू-दूत
सहिष्णू-दूत
1 min
202
मात्र इतुके माहित मजला
माणूस नाही खरा
तुझ्यासवे आयुष्य माझे
तूच दोस्तीचा चेहरा.....
दुनियेत सारी नाती
स्वार्थासाठी बोलती
निःशब्द बंध तुझे
तूच माझा सांगाती.....
कर्म माझे , धर्म माझा
तुझ्या निवाऱ्यात मुक्त मी
मानवतेच्या जाणिवा देणारी
सहिष्णू-दूत मी.....
