शिशिर ऋतू
शिशिर ऋतू
1 min
436
करू शिशिराचे स्वागत
हेमंत गेलाय बघ सरून
बहरू आपली प्रित वेल
वेचू फुले ओंजळ भरून
धुक्यांत नाहली पाखरे
लपलीत वृक्षांच्या पानी
रोमांचित होता अंगअंग
मोहरले सख्या मनोमनी
झाडांना फुटता नवी पालवी
गोठूनी वृक्ष-लताच थिजली
दवबिंदूंच्या टपोऱ्या थेंबात
धरणी चिंब चिंब ही भिजली
