शिशिर कळा* 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
शिशिर कळा* 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
1 min
478
शिशिर होताच सुरू
जंगल झाले निष्पर्ण
झाडाची गळली पाने
जोर धरला वाऱ्यानं
ही झाडे कोमेजलेली
कधी दिसेल गर्द वेली
कधी येणार पालवी
मिळणार ती सावली
जंगल दिसते बोडके
पानांचा सुकला सळा
कधी संपणार आता
झाडांच्या शिशिर कळा
खोडच दिसती येथे
गळलेले चोहीकडे
पानांसह फुले कधी
होतील लेकुरवाळे?
