शिर्षक : जिवनाच्या वाटेवर
शिर्षक : जिवनाच्या वाटेवर
1 min
260
जीवनाच्या वाटेवर, चालताना
अनेक येतात अनुभव, जीवन जगताना
सुख शोधताना आयुष्य पुढे निघुन जाते
स्वप्ने उराशी, पण सत्य काही औरच असते//1//
जीवनाच्या वाटेवर, चालताना
सोसाव्या लागतात, मरण यातना
तेंव्हा उगवते, सुखाची पहाट
आणि संपतो दुःखांचा वळणवेडा घाट//2//
गरजांचा डोंगर संपत नाही
कळतं पण वळत नाही
उद्याच्या भविष्याची, असते चिंता
अनेक गोष्टींचा, करावा लागतो समझोता//3//
वाऱ्याच्या वेगाने, मन पळते
हे का ते म्हणत माणसाला छळते
कळत नाही, मनाची भाषा
माणसाला दिसते फक्त आशा//4//
