शिंपणसरी
शिंपणसरी
1 min
64
नदी सागराची वाफ शिरे ढगांच्या उरात
रूप पावसाचे येता घेई मातीकडे झेप.
ग्रीष्म पोळतो उन्हाने लाही लाही जमिनीची
भेगाळल्या भुईटाचा थंड गवताचा लेप.
गार झुळूक वा-याची संगे सरींचे शिंपण
बांध बेडकांना घाली आळंब्यांचे नव-कुंपण.
डवरली सारी सृष्टी तृषा चातकाची शमली
पांग डोळ्यांचे फिटले,आस मनाची निवली.
