शिकवणी
शिकवणी
1 min
186
शाळेत जावू लागले
अभ्यासात रमू लागले
सवंगडीही मिळाले छान
सारे काही निभावले....
पुस्तकांशी गट्टी जमली
मैदानावर खेळात दंगली
गुरूजी ,बाईंची सर्वांचीच
उज्वला आवडिची झाली....
शिक्षण होते त्यावेळी मायेचे
बाई म्हणजे जणू मुलांची आई
आताही आहे तसेच पण जरा
काळ बदलला बाईंची झाली ताई...
शिकवणी इतर ठिकाणी लावावी
असही कधीच वाटले पण नाही
सर्वजण मन लावून अभ्यास करायचे
घरातून आईबाबा अभ्यासही पाही...
आता आई बाबाच्या खांद्याला खांदा लावते
घराबरोबर समाजातही मस्त वावरते
कुटुंबाची ,मुलांची जबाबदारी घेताना
घरासाठी पैसेही कमवून हातभार लावते....
