शिकवण..
शिकवण..
नदीच्या वाहत्या प्रवाहान शिकवलं
भल बुर,सुख दुःख चांगले,वाईट सगळं ऊदरात साठवूनही आयुष्य पुढे सरकत राहीलं
तुफान वादळात,पावसाच्या आंहाकारात कडाडनारया वीजा कोसळणारया
अगणित प्रचंड धारा झेलून ही स्थितप्रज्ञ राहिलेल्या दगडाने शिकविली कणखरता
असंख्य पक्षाची घरटी अंगाखांद्यावर अलगद सांभाळुन ऊन वारयापावसापासून त्यांचे संरक्षण करून
वाटसरूला छाया अन फळफुलांची माया घेणारया प्रत्येकाला निस्वार्थी पणे देणारया वृक्षाने दाखविला देण्यातला आनंद
मन नाही ना दगडाचे !व्यथित होते कधी एकाकी ऊदास,भावनां च्या कललोळात गुरफटून अश्रुंच्या पुरात डुंबून जाते.
अशावेळी पुस्तक खुप काही शिकवून जातात गुढ, रहस्यमय, वासतववादी कथेत शिरताना अश्रु सुकुन गेलेले असतात
