STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

2  

Tukaram Biradar

Others

शिक्षणाचे सौंदर्य

शिक्षणाचे सौंदर्य

1 min
92

सौंदर्य म्हणजे काय? 

तुम्ही शिक्षक आहात, तर तुमचे सौंदर्य फळ्यावर नीटपणे लिहीलेल्या अक्षरात असेल. विषयाचे आकलन झाल्यावर दिसणारे विद्यार्थी यांचे समाधान, आनंदी चेहरे, ही तुमचीच सुंदरता आहे. सौंदर्य कपड्यात नाही, कामात आहे. सौंदर्य नटण्यात नाही, विचारामध्ये आहे. सौंदर्य भपक्यात नाही, साधेेेेपणात आहे. सौंदर्य बाहेर कशात नाही, तर मनात आहे..! आपण करत असलेलं प्रत्येक काम म्हणजे सौंदर्याचं सादरीकरण असतं..! 

 

 आपल्याला आपल्या कृृृतीतून सौंदर्याची निर्मिती करता आली पााहिजे... प्रेमानं बोलणं म्हणजेे सुंदरता... आपलं मत योग्य रितीनंं व्यक्त करता येणं म्हणजे सुंदरता... नको असलेेल्या गोष्टीला नकार देण्याची हिंमत म्हणजे सुंदरता... दुसऱ्याला समजून घेणे म्हणजे सुुंदरता..! आपल्या विचारातूून, 

वर्तनातून आपलं सौंदर्य बाहेर आलं पाहिजे. हाती आलेेेला प्रत्येक क्षण रसरशीतपणे जगण्यात खरी सुंदरता आहे..! 


  आपण करत असलेल्या कामात कौशल्य प्राप्त झालं, की आपोआपच आत्मविश्वास वाढतो, आत्मसन्मानाची जाणीव म्हणजेच सौंदर्य होय..! फार आकर्षक व मौल्यवान सौंदर्याचा अर्थ असा व सर्वांना आवडले असे गृहीत धरू.


Rate this content
Log in