शिक्षणाचे गुणोत्तर
शिक्षणाचे गुणोत्तर
बाजारीकरणाच्या युगात,
आयुष्यच उतरलय बाजारात
शिक्षणाचा त्याला अपवाद कशाला ...
बाजारचं एकच साधन म्हणजे तराजू
तोलणं मापणं हाच एक नियम ठरलेला
कोणत्याही मापन पद्धतीत पैसा हेच त्याचं एकक
एकं दशम सहस्त्र केव्हाच झालय कालबाह्य,
कोटीच्या कोटी उड्डाणांचीच फक्त भाषा
या भाषेपुढे कुचकामी ठरते बुध्दीवंतांची भाषा ...
फी चा आकडा जेवढा जास्त तेवढी गुणवत्ता जास्त
हेच एक गुणोत्तर मानलं जातं प्रमाण,
नितीमत्तेच्या गोष्टी उरतात फक्त पुराणात
त्या अंगी बाणवायला या जन्मी तरी नसतो वेळ
नसतो तसा कुठला आदश॔ समोर
स्वयंप्रेरणेला उरलेल नसतं कोणतही स्थान ...
मग सुरू होते स्पर्धा अन् चढाओढ ,
फक्त पैसा मिळवण्यासाठी
शिक्षण होत चाललेय अधिकाधिक कर्जाऊ
अन् दिखाऊ
जागतिकीकरणाच्या रेट्यात पुढे जाण्यासाठी
सगळ्यांचीच भरड कशाला?...
प्री प्रायमरी पासून ते उच्च शिक्षणापर्यत मुल कायमच तोललं जातं पैशात
जेवढा जास्त पैसा तेवढ्या पदव्या जातात उंच
शिक्षणाद्वारा सर्वांगीण विकास ही संकल्पना ठरत जाते कालबाह्य,
जेव्हा पैशालाच फक्त उरते किंमत
जेव्हा पैशालाच फक्त उरते किंमत ...
