STORYMIRROR

Prashant Kadam

Others

4  

Prashant Kadam

Others

शिक्षण तरंच नोकरी ?

शिक्षण तरंच नोकरी ?

1 min
41K


असेल शिक्षण तर नोकरी मिळेल

असाच जर का समज असेल

मालक बनणे दूरापास्त होईल

समाजात मात्र गुलामीच दिसेल


शिक्षणा शिवाय नाही काही अडत

काम करण्याची असेल जर धमक

कुठलेही काम आहे सहज शक्य

शिकायचे मनी जर ठरवले पक्कं


देवाने केली मानवाची निर्मिती

मानवाने केली स्वतःच प्रगती

शिक्षणा शिवाय व्यापार केला

संशोधनातूनच समाज घडविला


आधी हवी मेहनत आणि जिद्द

ऊरत नाही मग कुठलीच हद्द

अशक्य असे काही नाही ऊरत

मन ऊगाच कधी नाही झूरत


ठरवू ते करण्याची लागते मग सवय

जीवनात आपल्या आणखी काय हवय

शिक्षण तरच नोकरी नको अट्टाहास

व्यवसाय करण्याचा असावा हव्यास


Rate this content
Log in