शिक्षण महागता...
शिक्षण महागता...
1 min
149
हुशारी होती पदरी
ध्येयही होते मोठे
शिक्षण महागता
एँडमिशनचं मिळेना कोठे?
दाम करी काम
हेच वास्तव रुजलयं
मेरिटच्या नावाखाली
शिक्षण खुप महागलयं
फी भरता भरता
पालकवर्ग कर्जाने भरडलाय
पात्र असुनही आज विद्यार्थी
नको तिथे अडकलाय
शिक्षणाचा बाजार मांडलाय
फी कमालीची वाढवुन
संपलय अवघं आयुष्य
शिक्षणासाठी जगतं कुढुन
